कर्जतला अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

ट्रकसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जतला अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील मांदळी येथे कर्जत पोलिसांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर, महादेव कोहक, पोलीस नाईक रवींद्र वाघ हे नगर सोलापूर रोड वरील मिरजगाव ते मांदळी रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की मिरजगावकडून मांदळीच्या दिशेने टाटा एस कंपनीचा ट्रक अवैध वाळू चोरून बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे.

खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून मांदळी बस थांब्याजवळ सदरील निळ्या रंगाचा ट्रक क्रमांक एम. ए.एस.9558 पकडला असता ट्रक ड्रायव्हर किरण नेमीचंद वाळुंजकर, राहणार कानडी बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला ताब्यात घेतले. वाळू वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसताना तो वाळू वाहतूक करत होता.

पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिलीप खैरे यांच्या फिर्यादीवरून वाळू तस्करी करणारा किरण नेमीचंद वाळुंजकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वाळू वाहतूक करणारा ट्रक व वाळू असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com