बनावट लस देणार्‍यावर कारवाईसाठी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

बनावट लस देणार्‍यावर कारवाईसाठी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

राहाता |वार्ताहर| Rahata

अस्तगाव (Astgav) येथील एका व्यक्तीने अडीशे रुपयात लस देतो असे सांगत बनावट लस (Fake vaccines) देऊन फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी यासाठी राहाता (Rahata) तालुक्यातील काँग्रेस (Cogress) पदाधिकार्‍यांनी तहसीलदार कुंदन हिरे (Tahsildar Kundan Hire) यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, अस्तगाव (Astgav) येथील एका व्यक्तीने 250 रुपयांत लस देतो असे सांगून नांदुर्खी (Nandurkhi) येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना 1500 रुपये घेऊन लस दिली. लस देणार्‍या व्यक्तीचा आरोग्य विभागाची कुठलाही संबंध नाही. सदरचा प्रकार हा निंदनीय असून लोकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. असा प्रकार जर सुरू असेल तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो. तरी सदर प्रकरणाची कायदेशीर चौकशी होऊन दोषींना कडक शासन करण्यात यावी.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. पंकज लोंढे, तालुका सरचिटणीस संजय जेजूरकर, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, शहराध्यक्ष बबनराव नळे, उपाध्यक्ष समद शेख, काँग्रेस कार्याध्यक्ष गणेश चोळके, युवक तालुका सरचिटणीस प्रविण घोडेकर, अपल्संख्यांक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख, सरचिटणीस अमीन पटेल, दादासाहेब गवांदे, किरण गायकवाड, सतीश अत्रे, नामदेव जेजूरकर, अनिल पठारे, दिलीप नळे, सलीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करून घ्यावे. बनावट लस देण्याचा प्रकार सुरू असेल तर तात्काळ तहसीलदार यांना कळवावे.

- अ‍ॅड. पंकज लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com