मजुरावर ऍसिड हल्ला
सार्वमत

मजुरावर ऍसिड हल्ला

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी)- शहरी भागातील ऍसिड हल्ल्यांच्या घटनांचे लोन आता अकोलेसारख्या ग्रामीण, आदिवासी भागातही पसरले आहे. व्यक्तिगत भांडणातुन एका आदिवासी ठाकर समाजाच्या मजुरावर ऍसिड हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच
अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे घडली.

या घटनेत अमृता भीमा पथवे(वय-30,रा.टाहाकारी,हल्ली-चास,ता सिन्नर)हा मजूर गंभीर भाजला असून याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही.  या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com