सहा महिन्यापासून पसार असलेला आरोपी जेरबंद

तोफखाना पोलिसांची कामगिरी
सहा महिन्यापासून पसार असलेला आरोपी जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खंडणी (Ransom) आणि जबरी चोरीच्या (Robbery) गुन्ह्यातील गेल्या सहा महिन्यापासून पसार असलेल्या आरोपीला (Accused) तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) एमआयडीसी परिसरातील (MIDC) जिमखाना मैदान (Gymkhana Grounds) येथून अटक (Arrested) केली. विजय भगवान कुर्‍हाडे (वय 19 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कुर्‍हाडे याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) खंडणी (Ransom) व जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Crime) आहे. गुन्हा दाखल (Filed a Crime) झाल्यापासून तो पसार होता. पोलिसांनी (Police) त्याला अनेक वेळा अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने हुलकावणी दिली होती. अखेर त्याला जिमखाना मैदान परिसरात शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार जपे, वाकचौरे, वसिम पठाण, इनामदार, सुनील शिरसाठ, चेतन मोहिते, बळे, अनिकेत आंधळे, केदार यांच्या पथकाने ही कामगिरी केेली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com