आरोपीने स्वत:च्या हातावर केले हत्याराने वार

जिल्हा न्यायालय आवारातील घटना
आरोपीने स्वत:च्या हातावर केले हत्याराने वार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याने न्यायालय आवारात स्वत: च्या हातावर धारदार हत्याराने वार केले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. कल्याण नारायण भिस्ते (रा. नवनागापूर) असे या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. भिस्ते याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो पसार होता. त्याच्याविरूध्द न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. एमआयडीसी पोलिसांनी त्याला मंगळवारी ताब्यात घेत अटक केली होती.

बुधवारी दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालय आवारात त्याने स्वत:च्या हातावर धारदार हत्याराने वार केले. त्याने हा प्रकार कोणत्या कारणातून केला याबाबत माहिती समजली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com