अहमदनगर|Ahmedagar

चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीला लुटणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकाश ऊर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

10 डिसेंबर रोजी चंदुलाल पठाण व त्यांच्या पत्नी झुलेखा चंदुलाल पठाण (रा. अंतरवाली ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे पती-पत्नी त्यांच्या दुचाकीवरून खर्डा ते जामखेड रोडवरून जात असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी पठाण यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. पठाण दांपत्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखविला व त्यांच्या जवळील सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी झुलेखा पठाण यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे. गुन्ह्यात चोरी गेलेला माल प्रकाश शिंदे याच्याकडे असून तो पिंपळगाव फाटा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी त्यांच्या पथकाला आरोपीला अटक करण्याच्या सुचना केल्या. पथकाने पिंपळगाव फाटा येथे जाऊन आरोपी शिंदेला अटक केली.