नेवाशाचा आरोपी पाठलाग करून पकडला

तोफखाना पोलिसांची कामगिरी; दरोडा, चोरीचे गुन्हे
नेवाशाचा आरोपी पाठलाग करून पकडला
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरोडा (Robbery), जबरी चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या माळी चिंचोरा (Mali Chichora) (ता. नेवासा) येथील आरोपीला तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) मंगळवारी रात्री अटक (Arrested) केली. गोरख अशोक माळी (वय 25) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. माळी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दरोडा (Robbery), सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

मंगळवारी रात्री तोफखाना पोलिसांकडून (Topkhana Police) तपोवन रोड (Tapovan Road) परिसरात गस्त सुरू असताना आरोपी माळी पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांना संशय आल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याच्याविरोधात पोलिसांनी तोफखाना पोलीस (Topkhana Police) ठाण्यात भादंवि कलम 122 अन्वये गुन्हा दाखल केला.

त्याच्याविषयी चौकशी केली असता तो दरोडा, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शैलेश गोमसाळे, धीरज खंडागळे, सतिष त्रिभुवन, सचिन जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी केेली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com