खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू

जिल्ह्यातील 'या' तालुक्यात घडली घटना
खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

तालुक्यातील तांभेरे (Tambhere) येथील आईला ठार मारल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून जेलची हवा खात असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे (वय वर्ष ४६) याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.

आरोपी राजेंद्र लांडे यास रात्री दोन वाजेदरम्यान पोटात त्रास जाणवु लागल्याने त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात (Rahuri Rural Hospital) दाखल केले. तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. सदर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असल्याचे सुत्राकडुन समजले.

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू
चितळीत तरुणाची आत्महत्या; पोलीस कर्मचार्‍याने छळ केल्याचा संदेश व्हायरल

दोन वर्षापुर्वी तांभेरे येथील राजेद्र लांडे (Rajendra Lande) याने एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र एकदशी असुन मी माळकरी आहे. मी बनवणार नाही, असे म्हणाल्याचा राग आल्याने राजेंद्र याने येवुन आईच्या डोक्यात जबर मारहाण केली. त्यात आईचा मृत्यू झाला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मयताचा दुसरा मुलगा दिगंबर लांडे यांनी ३०२ प्रमाणे खुनाची फिर्याद दिली होती.

आरोपी हा महिन्याभरापासुन आजारी होता. त्यास दोन आठवडेभरापुर्वी पुणे येथिल ससुन रुग्णालयात (Sassoon Hospital Pune) उपचार कामी दाखल केले होते. यानंतर पुन्हा राहुरी येथे आणण्यात आले असता त्यास रात्री त्रास होऊ लागला असता राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रताप साळवे यांनी त्यास मयत घोषित केले.

घटनेची माहिती कळताच तहसिलदार फसियोद्दिन शेख (Tehsildar Fasiuddin Sheikh), प्रांत अधिकारी दयानंद जगताप (Provincial Officer Dayanand Jagtap), पोलिस उपधिक्षक संदिप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke), पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal), नायब तहसिलदार गणेश तळेकर (Deputy Tehsildar Ganesh Talekar), राहुरीच्या न्यायाधीश सुजाता शिंदे (Rahuri judge Sujata Shinde), पोलिस उपनिरिक्षक मधुकर शिंदे (PSI Madhukar Shinde), निलेशकुमार वाघ, अदिनाथ पाखरे, अमित राठोड,सचिन ताजणे घटनेच्या ठिकाणी दाखल झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com