तीन घरफोड्या करणार्‍या आरोपीस केले जेरबंद

तीन घरफोड्या करणार्‍या आरोपीस केले जेरबंद

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वॉर्ड नं.2 येथील राहते घराचे जिन्याचे बंद घराचे दरवाजाचे आतील कडी काढून ओप्पो कंपनीचे 2 मोबाईल फोन घरफोडी करुन चोरून नेले. याप्रकरणी श्रीरामपूरशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 24 तासांच्या आतच श्रीरामपूर शहर पोलिसांनी घरफोडी करणार्‍यास अटक केली आहे.

याबाबत जमील इब्राहिम शहा वय-41 वर्षे धंदा- व्यापार रा.बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वॉर्ड नं.2 श्रीरामपूर ता.श्रीरामपूर,जि.अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता.

तसेच दि. 21 मे 2021 रोजी रात्री 10 ते दिनांक 22 मे 2021 रोजी सकाळी 06 वाजण्याचे दरम्यान संजयनगर वॉर्ड नं.2 श्रीरामपूर येथील गोडावून मधील खोलीची खिडकी कशाने तरी उघडून खिडकीतून टेबलावर ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेला याबाबत शकील शहा यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता.

तसेच दिनांक 21 मे 2021 रोजी रात्री बाबरपुरा चौक, काझीबाबा रोड वॉर्ड नं.2 श्रीरामपूर येथे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले याबाबत इसाक शहा यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेला गुप्त माहिती प्रमाणे शहबाज सलिम शहा वय-22 वर्ष, रा.काझीबाबारोड वॉर्ड नं.2 श्रीरामपूर यास वा ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्या संदर्भात सखोल तपास करता त्याने उपरोक्त तिनही घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडून तीन मोबाईल व एक मंगळसूत्र असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद तिन्ही घरफोड्यांचे गुन्हे घडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला पकडून त्याच्याकडून उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर आरोपीविरुध्द खालील प्रमाणे दरोडा तयारीचे दोन गुन्हे. दुखापतीचा एक गुन्हा, तसेच चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 380, 34, भादंवि कलम 325, 323, 504, 506, भादंवि कलम 399,402, म,पो.का.क 124 राहुरी पो.स्टे .ला भादंवि कलम 399,402 आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस नाईक बिरप्पा करमल पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com