एकाच आरोपीकडून चोरीच्या 20 मोटारसायकल हस्तगत

श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई || नगरसह शेजारच्या जिल्ह्यांत हातसफाई
एकाच आरोपीकडून चोरीच्या 20 मोटारसायकल हस्तगत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील एकाच आरोपीस मोठ्या शिताफीने जेरबंद करुन पोलिसांनी 9 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 20 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या आरोपीने सदरच्या मोटारसायकली श्रीरामपूर, संगमनेर, लोणी, आळेफाटा पुणे, बिबवेवाडी (जि.पुणे), सायंगाव (जि. नाशिक), तळेगाव, रहिमपूर, बेलपिंपळगाव, कोपरगाव या ठिकाणाहून चोरी केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी 9 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 20 मोटारसायकलीसह आरोपीस जेरबंद केले व दुसर्‍या कारवाईत चार सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपस्थित होत्या.

महिन्यापासून श्रीरामपूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांचा तपास करत असताना काल इब्राहीम गणी शाह (रा. बीफ मार्केट, वॉर्ड नं. 2) हा जिल्हा व परिसरात मोटारसायकल चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवत सापळा रचत त्यास जेरबंद केले.

इब्राहीम गणी शाह याने श्रीरामपूर शहरातून 6 मोटारसायकली चोरल्या होत्या यात बजाज प्लाटीना (क्र.एमएच 17-एक्यु-3968), टीव्हीएस स्टार (एमएच 17-डब्ल्यु-0252), होंडा शाईन (एमएच 17-बीजे-3381), हिरो आय स्मार्ट (एमएच 17-बीजी -2206), हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच 17-एपी -2673), बजाज बॉक्सर (एमएच 17-एन-8100), संगमनेर शहरातून हिरो एचएफ डिलक्स (एमएच 17-बीयू 8372), लोणी येथून होंडा शाईन (एमएच 17-सीई-4194), बजाज (एमएच 17-एयु-5673), आळेफाटा (पुणे) येथून हिरो स्प्लेंडर (एमएच 14-बीएन-0910), बिबवेवाडी (पुणे) येथून बजाज सीटी-100 (एमएच12 डीसी-2242), सायंगाव (जि.नाशिक) येथून हिरो स्प्लेंडर (एमएच 15-एएन-873), तळेगाव (ता. संगमनेर) येवून हिरो स्प्लेंडर (एमएच 17 एडब्ल्यु-3610), रहिमपूर (ता. संगमनेर) येथून बजाज डिस्कव्हर (एमएच05-बीएन 6080), बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथून बजाज प्लाटीना (एमएच 12 डीव्ही 1816), टीव्हीएस (एमएच 17 एएल 6160), कोपरगाव येथून हिरो एचएफ डिलक्स-(एमएच 17 बीटी 2530), पल्सर 125 (एमएच 17 सीटी 0904, विनानंबर हिरो सुपर स्पलेेंडर, कावासाकी बजाज (एमएच 16 आर 716) या गाड्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हा अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे, पोलीस नाईक वैभव अडागळे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस नाईक वीरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज राजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव या पथकाने केली.

काही मोटारसायकल भंगार म्हणून विक्री झाल्याचे समोर येत आहे. लवकरच अधिक तपास करुन भंगार व्यापार्‍यांनाही ताब्यात घेणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com