सराईत आरोपी किरण कराळेस अटक

सराईत आरोपी किरण कराळेस अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापूरवाडी (ता. नगर) परिसरात धुमाकूळ घालणारा सराईत आरोपी किरण कराळे (रा. कापूरवाडी) (Accused Kiran Karale) याला गावातील एका मंदिर परिसरामधून पळून जाण्याचा प्रयत्न असताना अटक (Arrested) करण्यात आली. त्याच्याविरूध्द पाच गुन्हे दाखल (Crime Filed) आहेत.

सराईत आरोपी किरण कराळेस अटक
व्यापार्‍याची ट्रकचालक व मालकाने केली सव्वातेरा लाखांची फसवणूक

आरोपी किरण कराळे हा 5 जानेवारी 2022 रोजी रात्री नऊ वाजता कापूरवाडी शिवारात आदित्य मुठे याच्यासोबत भांडण करत असल्याची माहिती त्यांचा भाऊ मयूर सुखदेव मुठे (वय 22 रा. कापूरवाडी) यांना समजली. मयूर हा त्याच्या दुचाकीवरून रस्त्याने जात असताना रस्त्यावर सराईत आरोपी कराळे याने त्याला अडविले. मयूर मुठे यांच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सराईत आरोपी किरण कराळेस अटक
बोकड कापण्याच्या कारणावरून 'त्यांनी' केला तरूणावर सुरीने हल्ला

या घटनेनंतर कराळे पसार झाला होता. मयूर यांनी भिंगार पोलिस ठाण्यात (Bhingar Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून किरण कराळे विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या गुन्ह्यात अटक (Arrested) करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश शिरसाठ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com