खून व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

खून व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

कर्जत | प्रतिनिधी

खून तसेच विनयभंगासारख्या तीन गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. संतोष हौसराव गोयकर, वय- ३३ वर्ष, रा खंडाळा, ता कर्जत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोयकर हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, श्रीगोंदा तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत न्यायालयात वारंवार गैरहजर होता. त्यास वॉरंट काढण्यात आले होते. वारंवार शोध घेऊनही मिळून येत नव्हता.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, श्रीगोंदा येथे ३५४ या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, खून केल्याचा खटला कलम ३०२ तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ असे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.

हा आरोपी मागील सात-आठ महिन्यापासून फरार होता. कर्जत पोलिसांनी गोपनीय माहिती काढून त्यास १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री मिरजगाव येथून अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, बाळासाहेब पाखरे, पोलीस जवान दीपक कोल्हे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com