
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
पोलीस ठाण्यात चुलत बहिणीने केलेली केस मिटवून घ्यावी यासाठी धमक्या देत तलवारीने वार करून वांगदरी येथील एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस श्रीगोंदा न्यायालयाने 5 वर्षे कैद व 8 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
महेंद्र बाजीराव महानोर (रा. डोमाळवाडी, वांगदरी, ता. श्रीगोंदा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 17 मार्च 2022 रोजी वांगदरी यैथे घडली होती. आरोपी महानोर हा फिर्यादी अर्जुन मदने याच्याकडे येऊन तुझ्या चुलत बहिणीने माझ्या विरूद्ध केलेली केस मिटवून का घेतली नाही. असे म्हणत शिवीगाळ करून हातातील तलवरीने हल्ला केला. यामध्ये मदने गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीगोंदा पोलीसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एम. एस. शेख यांच्या पुढे सुनावनी सुरू होती. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणुन संगीता ढगे, अनिल घोडके, एम.पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. यात सहा साक्षीतदार तपासण्यात आले. जखमी, फिर्यादीची पत्नी, वैद्यकीय अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.