
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
प्रभात डेअरी कंपनीच्या मेंटेनन्स वर्क शॉपमध्ये ठेवलेला 58 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणार्या दोघा आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.
14 फेब्रुवारी रोजी प्रभात डेअरी कंपनीच्या मेंटेनन्स वर्क शॉपमध्ये ठेवलेला 43 हजार 400 रुपये किमतीचे 7 स्टीलचे एसएस. वॉल प्रत्येकी 6 हजार 200 रुपये प्रमाणे, 13 हजार 500 रुपये किमतीचे एक स्टीलचा एसएस. वॉल तसेच 1 हजार 600 रुपये किमतीची अंदाजे 12 फूट लांबीची काळ्या रंगाचे आवरण असलेली अर्धा इंची जाडीची जु. वा. कॉपर केबल असा एकूण 58 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथक नेमले होते. पोलिसांनी सदर चोरीचा तपास करून गोपनीय यंत्रणा व घटनास्थळावरील तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे जीवन सुभाष खरात (वय 27) व आदित्य मच्छिंद्र रगडे, (वय 19, दोघेही रा. खिलारीवस्ती वॉर्ड नं. 6 श्रीरामपूर) या संशयितांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेत त्यांच्याकडे विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून एकूण 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक व्ही. एम. पाटील, परि. पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, परि. पोलीस उप निरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, साईनाथ राशीनकर, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस शिपाई रमीझराजा अत्तार, गणेश गावडे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, गौरव दुर्गुळे यांनी सदरची कार्यवाही केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साईनाथ राशीनकर करीत आहेत.