पसार असलेल्या दोन आरोपींना अटक

या पोलिसांची कारवाई
पसार असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. वसीम रशिद शेख (वय 42 रा. कोठला) व कैलास मदनलाल काला (वय 50 रा. माळीवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमरावती शहरातून एका अल्पवयीन मुलाचे अपहर करून त्याला नगर येथे आणले होते. या प्रकरणी अमरावती शहरातील राजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी नगर एलसीबीने त्या मुलाची सुटका करत अपहरण करणार्‍या आरोपींना अटक केली होती. याच गुन्ह्यात पसार असलेला वसीम रशिद शेख हा कोठला परिसरात आल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांना शेख याला ताब्यात घेवून अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

तपोवन रोडवरील वेश्याव्यावसायावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी कैलास मदनलाल काला याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, शहर उपअधीक्षक अनिल कातकाडे, निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन, संदीप गिर्‍हे, धिरज खंडागळे यांच्या पथकाने या दोन्ही कारवाई केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com