दामदुप्पटचे आमिष दाखवून 7 कोटींना गंडा

दामदुप्पटचे आमिष दाखवून 7 कोटींना गंडा

सोनई (वार्ताहर) / Sonai - सोनईत चार वर्षांपूर्वी संकल्पसिध्दी, उज्वलम, माऊली मल्टीस्टेट व प्रॉफिट हॉलिडे या संस्थांच्या माध्यमातून वर्षाला दामदुप्पटचे आमिष दाखवत सात कोटी रुपयास गंडा घालून फरार झालेल्या सहापैकी एका प्रमुख आरोपीस नाशिक (nashik) येथून अटक करण्यात आली आहे.

चार वर्षं उलटूनही गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सोनई व परीसरात फसवणूक झालेल्या सर्व तक्रारदारांच्या वतीने जानेवारी 2021 मध्ये आण्णासाहेब दरंदले यांनी फिर्याद दिल्यानंतर भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, 34 नुसार विष्णू रामचंद्र भागवत रा. दवंडगाव (जि. नाशिक), निलेश जनार्दन कुंभार रा. मंचर (जि. पुणे), सुरेश सिताराम घंगाडे रा.तळेगाव (जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे रा. कोतुळ (जि.नगर), शांताराम अशोक देवतरसे रा. सोनई यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मुख्य आरोपी विष्णू भागवत यास दोन दिवसापूर्वी नाशिक येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यास नेवासा न्यायालयापुढे उभे केले असता आरोपीस पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरंदले यांनी फिर्यादीत म्हटले होते की, अंजनी हॉटेल, मुळा गट परीसर, संकेत हॉटेल (आळेफाटा) व शिर्डी (shirdi) येथे बैठक घेवून उज्वलम अ‍ॅग्रो, माऊली मल्टीस्टेट, संकल्पसिध्दी इंडिया प्रा.लि., प्रॉफिट टिचर फ्लाय हॉलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष दाखविण्यात आले. विमान प्रवासाने सहल व जमिनीचे अश्‍वासन देण्यात आले. संबंधितांनी सन 2017 ते 2019 दरम्यान पैसे जमा करुन नेले. मात्र दामदुप्पट अथवा मुद्दलसुद्धा देण्यात आली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com