
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopargav
कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवर राहत्या घराच्या छतावर दत्तात्रय गंगाधर भुजाडे अंदाजे (वय 75) व पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले होते. सदर दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते.
या प्रकरणी खुन करुन जबरी चोरी करणाऱ्या पढेगाव येथील तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे. अजय छंदू काळे (वय १९), अमित कागद चव्हाण(वय २०) व जंतेश छंदू काळे(वय २२) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात जेरबंद केले आहे.