संगमनेर | प्रतिनिधी

मारुती सुझुकी कंपनीच्या नव्या सात चारचाकी वाहने घेवून जाणार्या कंटेनर चालकाला

चाकुचा धाक दाखवून लुटणार्या दरोडेखोरास मुद्देमालासह संगमनेर तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. त्याच्याकडुन कंटेनरसह नवी 7 वाहने असा एकूण 90 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.

हिदायत हनिफ खान (रा. छरोरा, ता. ताऊर, जि. मेवात, राज्य हरियाना) हा त्याच्या ताब्यातील कंटेनरमधून मारुती सुझुकी कंपनीच्या 7 नवी चारचाकी वाहने घेवून दिल्ली ते गोवा निघाला होता.

दरम्यान संगमनेर तालुक्यात आल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ चहा पिण्यासाठी तो थांबला. कंटेनरची हवा चेक करत असतांना पाठीमागून दुचाकीहून एक जण तेथे आला त्याने हातातील कटरचा धाक दाखवून चालकाच्या इतर चार साथीदारांना बोलावून घेवून चालकाचे खिशातील पाकीट व कंटेनर घेवून पळून गेला. कंटेनर चालकाने 100 नंबरवर संपर्क करत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
.खळबळजनक! आईसह चार मुले बेपत्ता.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सहकार्यांना सोबत घेत तपास केला. अवघ्या चार तासात कंटेनर व दरोडेखोर अकलाक असिम ऊर्फ अकलाक असिफ शेख (रा. खलीलपुरा, ता. जुन्नर, हल्ली रहाणार कुरण, ता. संगमनेर) यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
.डॉ.संजय मालपाणी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 104/2021 भारतीय दंड संहिता 395 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार आय. ए. शेख करत आहे