गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर फरार झालेला आरोपी जेरबंद

गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर फरार झालेला आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चेक बाऊन्स प्रकरणाच्या चार गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. विजय मुरली नरवाल (रा. सदर बाजार, कंजारवाडा, भिंगार) असे आरोपीचे नाव आहे.

नरवाल याने उसनवारी घेतलेल्या तीन लाख 48 हजार रूपयांच्या रकमेसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने त्याच्याविरूध्द अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चार फौजदारी खटले दाखल होते. त्यावर एकत्रितरित्या सुनावणी होऊन तीन लाख 48 रूपये फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सक्षम कारावासाचा आदेश देण्यात आला होता.

नरवाल न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने त्याच्याविरुध्द वॉरंट काढून कारवाईचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. नरवाल हा जामखेड रोड येथे असल्याची माहिती मिळताच पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार फकिर शेख, संदीप घोडके, विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दीपक शिंदे यांनी नरवाल याला अटक केली.

Related Stories

No stories found.