अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.15) श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे शिवारात घडली. पप्पु उर्फ दत्तात्रय भिवसेन धारकर (28, रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा) असे या घटनेत मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत दत्तात्र्य हा फिटर असल्याने बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक (एम.एच.16 सी.डब्ल्यु 0816) ही दुरुस्त केलेली दुचाकी चेक करण्यासाठी चक्कर मारण्यासाठी गेला होता.

देऊळगांव गलांडे ते मांडवगण रोडवर जयराम सटाले यांचे शेताजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव अज्ञात वाहनाने त्यास धडक दिल्याने यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन त्यास मदत न करता वाहन चालक फरार झाला. या अपघाताची श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com