मुलीला भेटण्यासाठी चाललेल्या पित्याचा दुदैवी अंत

मुलीला भेटण्यासाठी चाललेल्या पित्याचा दुदैवी अंत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराजवळील साई धाम कमानींजवळ नगर-मनमाड रस्त्यावर एक ट्रकने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत सचिन काशिनाथ रोहोम (वय-30) रा.खिर्डी गणेश ता.कोपरगाव हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

मुलीला भेटण्यासाठी चाललेल्या पित्याचा दुदैवी अंत
कोपरगाव सावळीविहीर फाटा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

साई धाम कमानीजवळ सोमवारी दुपारी 3.45 वाजता घडली. भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने दुचाकीस्वारास उडवले आहे. त्यात सचिन रोहोम हा जागीच ठार झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रस्त्यावर गाळ साचून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मयत सचिन हे मुलगी माहेश्वरी हिला भेटण्यासाठी शिर्डी येथील रूग्णालयात जात असताना भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने (क्रं.यू.पी.78 डी, एन.9091) याने त्यांच्या दुचाकीला (हिरो होंडा सी.डी.डिलक्स क्रं.एम.एच.17 ए.एल.2975) स्वारास मागील बाजूने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाले.

मुलीला भेटण्यासाठी चाललेल्या पित्याचा दुदैवी अंत
गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी

कंटेनर चालक कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन अपघात ग्रस्त इसमास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय उपचार करणार्‍या अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केल. सचिन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

महेश हरिभाऊ रोहोम (वय-25) रा.खिर्डी गणेश यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.219/2022 भा.द.वि कलम 304,(अ) 279,337,338,427 मोटार वाहन कायदा कलम 184,134,(अ)(ब) 177 प्रमाणे दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com