पायी दिंडीत वाहन घुसले; पाच महिला जखमी

पायी दिंडीत वाहन घुसले; पाच महिला जखमी
Accident

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीत चाललेल्या वारकर्‍यांना नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर (ता. नगर) शिवारात एका वाहनाने धडक दिल्याने पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. गुरूवारी दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कल्पना विजय कोळी (वय 50), भिकुबाई भगवतीराव पाटील (वय 68, दोघी रा. टाकळखेडा ता. अंमळनेर, जि. जळगाव), निर्मला लक्ष्मण सपकाळ (वय 62 रा. कानोडा ता. जि. जळगाव), रत्नाबाई सुधाकर पाटील (वय 60 रा. चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव), मालताबाई गोकुळ कोळी (वय 47 रा. धरणगाव ता. पाचोरा, जि. जळगाव) अशी जखमी वारकरी महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धरणगाव येथील भगवान बाबा दिंडी पंढरपूरकडे जाण्यासाठी नगरच्या दिशेने येत होती. या दिंडीत पायी चाललेल्या वारकर्‍यांना गुरुवारी दुपारी जेऊर शिवारातील जरे वस्तीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेने पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com