डंपर-दुचाकीची धडक; महिला डॉक्टरचा मृत्यू

डंपर-दुचाकीची धडक; महिला डॉक्टरचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डंपरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. शिबोन अशोक टेंभेकर (वय 56 रा. अरणगाव, ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. गुरूवारी सकाळी शहरातील कायनेटिक चौकात ही घटना घडली.

बांधकामासाठी लागणार्‍या खडीची वाहतूक करणार्‍या डंपरने टेंभेकर यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात टेंभेकर यांच्या मोपेड दुचाकीचा चक्काचुर झाला. डंपरच्या पुढील चाकाखाली टेंभेकर यांची दुचाकी गेली. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी शिबोन टेंभेकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com