दोन अपघातात दोघांचा मृत्यू; कुठे घडली घटना ?

अपघात
अपघात

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. अविनाश बालाजी चेंडके (वय 24 रा. लातुर, हल्ली रा. डेंटल कॉलेज, वडगाव गुप्ता ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. सदरचा अपघात बुधवारी पहाटे तीन वाजता शेंडी (ता. नगर) शिवारात व्दारकादास शोरूम समोर झाला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरा अपघात बुधवारी सकाळी आठ वाजता नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर (ता. नगर) बस स्थानकावर झाला. येथे अनोळखी पुरूषाला वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते.

तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्याची ओळख पटली नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com