
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर (Sangmner) तालुक्यातील तळेगाव दिघे (Talegav Dighe) येथील बाजार तळानजीक असलेल्या अपघाती वळण रस्त्यावरील पुलावर मालट्रक उलटून अपघातग्रस्त (Truck Accident) झाला. सदर मालट्रकखाली दुचाकी दबली असून उडी फेकल्याने दुचाकीस्वार बांलबाल बचावला. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर (Road from Loni to Nandurshingote) रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही अपघाताची (Accident) घटना घडली.
तळेगाव दिघेमार्गे (Talegav Dighe) असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने पावडर मटेरियल गोण्या भरलेला मालट्रक (एम. एच. 45 एएफ 9577) नाशिकच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर मालट्रक तळेगाव दिघे बाजारतळानजीक आला असता अरुंद रस्ता असल्याने अपघाती वळण पुलावर अपघातग्रस्त झाला. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून किरण रामनाथ दिघे हा युवक गावात येत होता. मात्र मालट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला.
दरम्यान दुचाकी मालट्रकखाली दबली. ओढ्यावरील अरुंद पुलावर अपघात झाल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य गणेश दिघे, युवक कार्यकर्ते अमोल दिघे, गणेश गोर्डे, संपतराव दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार (Sangmner Police Station PI Pandurang Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सदर अपघाती वळण रस्त्यावर व पुलावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडलेल्या असून जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
अन्यथा आंदोलन छेडणार
तळेगाव दिघे बाजारतळा नजीकच्या वळण रस्त्यावरील अपघाती पुलावर वारंवार अपघात होतात. या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सदर अपघाती वळण रस्त्याची व पुलाची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी दिला आहे.