अपघातानंतर ट्रक चालकाने केली आत्महत्या

अपघातानंतर ट्रक चालकाने केली आत्महत्या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी घाटात धोकादायक वळणावर एका ट्रकचा अपघात होऊन त्यानंतर चालकाने आत्महत्या केली आहे. ट्रकचा अपघात झाला त्या भीतीने ट्रक चालक योगेश तुकाराम कव्हळे (वय 22 रा.कारखेले बु. ता.पाथर्डी) याने जवळच असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवार (दि 9) रोजी एम एस 09 बी सी 3982 क्रमांकची दहा चाकी ट्रक पुणे जिल्ह्यातील यवत वरून माणिकदौंडीच्या घाटातून पाथर्डीकडे येत असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून धोकादायक वळणावर ट्रक पलटून सुमारे 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात कोसळला.

गुरुवारी पहाटे एका झाडाला कुणतरी व्यक्ती लटकलेला असल्याचे निदर्शनात आले व बाजूला अपघातग्रस्त ट्रक पडलेला आहे. अशी माहिती पोलिस नाईक निलेश म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com