पंढरपूर येथून परतणार्‍या पाथर्डीच्या वारकर्‍यांच्या वाहनास अपघात

एक ठार, बाराजण जखमी
पंढरपूर येथून परतणार्‍या पाथर्डीच्या वारकर्‍यांच्या वाहनास अपघात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी येणार्‍या पाथर्डी (Pathardi) येथील वारकर्‍यांची पिकप गाडी पल्टी होऊन झालेल्या अपघातात (Accident) एका वारकर्‍याचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर दहा ते बारा वारकरी जखमी (Injured) झाले असून यातील तीन वारकरी गंभीर जखमी 9Injured) आहेत. आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) हाकेवाडी फाटा परिसरात हा अपघात रविवारी (दि.10) रात्री झाला आहे. रावण सखाराम गाढे (55, रा. धनगरवाडी, ता. पाथर्डी) असे या अपघातात मृत्यु झालेल्या वारकर्‍याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) धनगरवाडी (Dhangarwadi) येथील वारकरी हे श्रीक्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने परत येत होते. रविवारी रात्री बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) हाकेवाडी फाट्यावर वारकर्‍यांची पिकअप गाडी खडीच्या ढिगारावरून जाऊन पल्टी झाली. या अपघातात (Accident) रावण गाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बंडू बाजीराव गाढे, हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाढे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे सर्व राहणार ( धनगरवाडी ता पाथर्डी) या जखमींना अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच धनगरवाडीचे अशोक गाढे, मिठू चितळे, मच्छिंद्र चितळे, आजिनाथ गाढे, प्रकाश चितळे, भाऊ पवार, नारायण पवार आदींनी अपघातग्रस्तांसाठी मदत केली. माणिकदौंडीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ यांनी या घटनेची माहिती आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांना देऊन राजळे यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना सहकार्य केले. अपघातात मृत पावलेले रावण गाढे यांच्या वारसाला व अपघातात जखमी असलेले वारकरी यांच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी राज्य सरकार कडून मदत होण्यासाठी आपण आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ओव्हळ म्हणाले.

अवघे काही मिनीटांवर गाव

गेली काही दिवसांपासून दिंडीत सहभागी तसेच एकादशीदिनी दर्शनासाठी गेलेल्या वारकर्‍यांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पार केले होते. या सर्व वारकर्‍यांचे धनगरवाडी हे गाव अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर राहिले असताना आष्टीच्या हाकेवाडी फाटा येथे ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com