मालवाहू दोन कंटेनरला अपघात; एक टायर दुकानात घुसला

मालवाहू दोन कंटेनरला अपघात; एक टायर दुकानात घुसला

आळेफाटा | Alephata

पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) आळेफाट्यानजीक (Alephata) दोन मालवाहू कंटेनरचा अपघात (Accident) झाला. अचानक समोर कंटेनर (Container) आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून पुण्याकडे जाणारा दुसरा कंटेनर (Container) रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला. हा अपघात (Accident) शनिवार (दि.11) रोजी पहाटेच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून इंदोर (मध्यप्रदेश) येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर एन.एल 01 एडी 8531 रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला. तर पुण्याकडून नाशिककडे जाणारा कंटेनर डी.डी 03 के 9408 रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजू लोक जमा झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दुपारपर्यंत वाहने जाग्यावर होती.

दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपासचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित असून शनिवारी व रविवारी आळेफाटा चौकात वाहनांची मोठी कोंडी होते. तर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने मालावाहातून वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com