पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी

पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी

जेऊर कुंभारी | वार्ताहर 

पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. पिकअप आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांसह बैल जखमी झाले आहेत. डाऊच खुर्द परिसरात हा अपघात घडलाय. ही बैलगाडी ऊसतोड करणाऱ्या मजुराची होती.

मिळालेल्या माहितीनुसार पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर डाऊच खुर्द हद्दीत कर्मवीर काळे कारखान्याची ऊस वाहतूक करणारी बैलगाडी व पिकअप यांच्यात धडक झाली. या अपघातात बैलगाडी मधील दोन पुरुष व एक महिला यांच्यासह बैल जखमी झाले आहे.

पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटला, कार दुभाजकावर आदळली, एअर बॅग उघडले पण...

सदर रिकामी बैलगाडी ही कोपरगावच्या दिशेने जात होती व त्याच दिशेने जाणारा पिकअप (एम एच ०४ एच डी ८१२३) यांने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीतील राजेंद्र मंगू राठोड (वय ५०), दाजीबा राजेंद्र राठोड (वय ३०) व एक महिला शोभा दिलीप गायकवाड (वय ३५) हे जखमी झाले आहेत तसेच बैलगाडीचे बैलांना देखील जखम झालेल्या आहेत.

पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी
धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात

घटनास्थळी सकाळच्या व्यायामाला जात असताना देवा पवार, आकाश पवार व जोगेश्वी इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन सागर होन यांनी ग्रामीण रुग्णालयाला कळवून रुग्णवाहिकेतून जखमींना संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे चौकशी केली असता सदर जखमींना उपचार करून सोडून देण्यात आले असल्याचे समजते. सदर गुन्ह्याची नोंद अद्याप पोलीस स्टेशनला झालेली नाही.

पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी
इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००...; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com