क्रुझरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

क्रुझरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

औरंगाबाद-नगर राज्य महामार्गावरील औदुंबर हॉटेलजवळील चौकात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन चारचाकी वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरुण दत्ता विधाटे रा. मारकळी वस्ती नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता अहमदनगर ते औरंगाबाद हायवे रोडवरील औदूंबर हॉटेल जवळ मी औरंगाबाद येथून गंगापूर कोर्टातून माझे काम करून मी माझ्या मालकीची असलेली टी.व्ही.एस मोटारसायकल (एमएच 17 यू 9352) वरुन नेवासा येथे येत असताना हॉटेल औदूंबर जवळील चौकात आलो असता रोडवर समोरून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी क्रुजर (एमएच30 एटी 0206) वाहनावरील चालकाने त्याचे ताब्यातील गाडी हयगयीने अविचाराने रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून आमचे मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली.

या अपघातात माझ्या पाय फॅक्चर होवून झालेल्या दुखापतीस तसेच मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता निघून गेला. या फिर्यादीवरुन क्रुझर चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 279,337,338, 457 मोटार वाहन कायदा कलम 134(अ) (ब) 184, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com