
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील डीएसपी चौकात बुधवारी रात्री 11 च्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसपी चौकात बुधवारी रात्री 11 च्या सुमारास एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला उडविले.
या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला. अपघातातील मयताची ओळख पटली नसून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डीएसपी चौकासह शहरातून जाणार्या नगर-पुणे महामार्गावर अवजड वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत.
त्यामुळे अवजड वाहतूक पुर्णतः बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अवजड वाहनाने यापूर्वी इंपिरिअल चौक, पत्रकार चौक, सक्कर चौकांत अपघात होऊन अनेकांचा बळी घेतलेला आहे.