भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पारनेर तालुका | प्रतिनिधी

पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत होणारे व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्यामध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राजू राम म्हस्के (वय ७ वर्षे), हर्षदा राम म्हस्के (वय ४ वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय.१६वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून साधना राम म्हस्के (वय ३५) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील सर्व आवाने बुद्रुक (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com