<p><strong>श्रीगोंदा | Shrigonda</strong></p><p>ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दुचाकी वरून प्रवास करणारे लोणी व्यंकनाथमधील चार तरुण ठार झाले आहे.</p>.<p>नगर-दौड महामार्गावर लोणी व्यकांनाथ मधील पवारवाडीजवळ बुधवारी ( दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रकने दुचाकीस्वाराना धडक दिल्याने हा अपघात झाला. लोणी व्यंकनाथमधील राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे व प्रतिक नरसिंग शिंदे हे चौघे जण मोटारसायकलवरून लोणीव्यंकनाथ गावात येत होते. नगर दौंड महामार्गावर पवारवाडीजवळ उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना नगरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे हे जागीच ठार झाले. तर प्रतिक नरसिंग शिंदे हा गंभीर जखमी झाला होता याला दौंड कडे उपचारासाठी नेत असताना त्याचाही मृत्यू झाला.</p>