दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी

दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी

तळेगाव दिघे l वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होत झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.

बबन सीताराम दिघे (वय ६० वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर दिलीप निवृत्ती दिघे असे गंभीर जखमीचे नाव आहे. संगमनेर - कोपरगाव रस्त्यावर बुधवारी (दि.५) रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी
Video : लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या संगमनेर-कोपरगाव रस्त्याने संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने दिलीप निवृत्ती दिघे हे दुचाकीवरून प्रवास करीत होते. दरम्यान बबन सीताराम दिघे हे संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील जुन्या खडी क्रशरनजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होत अपघात झाला. या अपघातात जबर मार लागल्याने बबन सीताराम दिघे हे जागीच ठार झाले, तर दिलीप निवृत्ती दिघे हे गंभीर जखमी झाले. जखमी दिलीप दिघे यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी भास्कर सीताराम दिघे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून दिलीप निवृत्ती दिघे यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com