तीन वाहनांच्या अपघातात चार जखमी

तीन वाहनांच्या अपघातात चार जखमी
Accident

सुपा |वार्ताहर| Supa

नगर-पुणे महामार्गावर (Nagar-Pune Highway) नारायणगव्हाण (Narayangavhan) शिवारात ट्रक चालकाचे (truck Driver) नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून समोरच्या वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) चार जण जखमी (Injured) झाले. याबाबत सचिन बोरुदिया यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले, पुणे महामार्गावर (Pune Highway) ते गाडी एमएच 14 ईयु 0709 या ईको गाडीला नारायणगव्हाण (Narayangavhan) शिवारातील नवले मळा येथे समोरून पुण्याच्या दिशेने जात असलेला सीजी 04 एमएच 2915 या क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून दुसर्‍या बाजुच्या गाडीला जोराची धडक दिली.

यात इको गाडी पलटी होऊन गाडीत असलेल्या ललिता माणिकचंद बोरुदिया, सुप्रिया सचिन बोरुदिया, राज सचिन बोरुदिया व तनिष बोरुदिया हे चौघे जखमी झाले. तर त्याचवेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जात असलेल्या हिगोंली डेपोची बस क्रमांक एमएच 20 बीएल 2851या गाडीवरही तो मालट्रक धडकला.आशा तिहेरी अपघातात (Accident) तीन गाड्याचे नुकसान होऊन चार व्यक्ती जखमी झाल्या. सुपा पोलिसांनी (Supa Police) तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून अपघातातील जखमी (Injured) व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com