लोणीजवळ भीषण अपघात; दोघांची प्रकृती चिंताजनक

लोणीजवळ भीषण अपघात; दोघांची प्रकृती चिंताजनक

लोणी | वार्ताहर

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावाजवळ तळेगाव रस्त्यावर आज दुपारी बोलेरो आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बोलेरो लोणी बुद्रुक येथील असून ती लोणी खुर्द येथील स्मशान भूमी जवळून लोणी बुद्रुककडे जाण्यासाठी वळण्याचा तयारीत असताना पाठीमागून आलेल्या कारने तिला जोराची धडक दिली.

कारचालक व त्याचा सहकारी दोघेही लोणी खुर्द येथील असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर बोलेरो मधील दोघेजण लोणी बुद्रुक येथील असून ते किरकोळ जखमी आहेत. दोन्ही वाहनामधील जखमींना काचा व दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com