मॉर्निंग वॉक करताना पिकअपने उडवलं, एकाचा मृत्यू

कर्जत- वालवड रस्त्यावर अपघात
मॉर्निंग वॉक करताना पिकअपने उडवलं, एकाचा मृत्यू

कर्जत | प्रतिनिधी

मॉर्निंग वॉक करत असताना पिकअपने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कर्जत- वालवड रस्त्यावर वीज केंद्राजवळ शनिवारी (दि. ८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात रामदास सावळा तापकीर (वय : ७०, रा. स्वामी समर्थ नगर, कर्जत) यांचा जागीच मृत्यू झाला.

मॉर्निंग वॉक करताना पिकअपने उडवलं, एकाचा मृत्यू
आमिषाला बळी पडले अन् सात लाखांना फसले

कर्जत पोलिसांनी पिकअप (एमएच १७, बीवाय ५९२७) व चालक योगेश मधुकर भगरे (रा. पोहेगाव ता. कोपरगाव) याला ताब्यात घेतले आहे.

मॉर्निंग वॉक करताना पिकअपने उडवलं, एकाचा मृत्यू
नशिबाने मारले अन् देवाने तारले... ऊस तोडणी मजूर महिलेची बसस्थानकातच प्रसूती

मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण अंधारे हे करत आहेत.

मॉर्निंग वॉक करताना पिकअपने उडवलं, एकाचा मृत्यू
मालवाहतूक पिकअप विहिरीत पडून भिषण अपघात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com