ट्रकमधून बाहेर आलेला अँगल लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी

सुपा औद्योगिक वसाहतीत अपघात
ट्रकमधून बाहेर आलेला अँगल लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अज्ञात अवजड ट्रक चालकाच्या बेफिकरपणामुळेे ट्रकमधून बाजुला बाहेर आलेला लोखंडी अँगल डोक्यात घुसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील सुपा औद्येागिक वसाहतीतील जांभूळ ओढा नाजिक येथे घडली.

अविनाश सिंग (रा. सुपे, पुर्ण पत्ता नाहीे) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 19) सायंकाळी आठवाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत काम करणारे दोघे तरूण दुचाकीवरून सुपा गावाकडे चालले होते. दरम्यान लोखंडी अँगल भरलेला अवजड ट्रकही सुपा गावाच्या दिशेने चालला होता. या ट्रकमधील अँगल एका बाजूला झूकल्याने बाहेर आले होते. या ट्रकला दुचाकीवरील तरूण ओलांडून पुढे जात असतांना ट्रकमधील अँगल दुचाकी चालक विनाश सिंगच्या डोक्यात घुसला.

यामध्ये त्याच्या कवटीपर्यंत मार लागून कवटी फॅक्चर झाली आहे. मागे बसलेला तरुण नशीब बलवत्तर म्हणुन वाचला आहे. नागरीकांनी सिंग यास तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असून त्याची परिस्थिती गंभिर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले आहे. दरम्यान पोलीसांनी शोध घेऊनही संबधीत ट्रक मिळून आला नाही. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतीत माल भरण्यासाठी येणार्‍या अश्या बेफिकीर वाहन चालकांना पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर अश्या कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागतील अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com