अज्ञात वाहनाच्या धडकेत एक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक गंभीर जखमी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिरसाटवाडी शिवारातील बारामती - अमरपुर राज्य महामार्गावर मंगळवारी (दि.14) दुपारी घडली. पाथर्डी शहरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये काम करणारा कामगार संदीप माधु पगारे हा आपल्या केळवंडी गावाकडे जात असताना अज्ञात चार चाकी वाहनाने पगारे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

त्यामध्ये संदीप पगारे हे गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडले गेले. या अपघातात पगारे यांचा उजव्या पायाची मांडीचा चुरा झाला. अपघात झाल्याच्या बाजूला शेतात काम करणार्‍या महिला कामगारांनी अज्ञात पिकप वाहनाने धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहिले आहे. याच रस्त्यावरून जाणारे वाळूंचे माजी सरपंच रणजीत बेळगे, अकोल्याचे माजी उपसरपंच अर्जुन धायतडक, बाळासाहेब गर्जे यांनी जखमी पगारे याला रुग्णवाहिकेतून पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर संदीप पगारे यांना अहमदनगर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com