पार्किंगमध्ये धडक, मायलेकी जखमी

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

नगर क्लबच्या पार्किंगमध्ये एकाने भरधाव वेगात वाहन चालवून मायलेकींना धडक दिली. यात दोघीही जखमी झाल्या आहेत. धडकेत त्यांच्या गाडीसह इतर गाड्यांचेही नुकसान झाले आहे. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रीमा अभिमन्यू चौहाई (वय 40, रा. गुलमोहर पोलिस चौकीजवळ, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रवीण अजित घैसास (पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रीमा व त्यांची मुलगी टीस्या अभिमन्यू चौहाई या धडकेत जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. फिर्यादी व त्यांची मुलगी नगर क्लबच्या पार्किंगमध्ये गाडीत बसत असताना घैसास याने भरधाव वेगात वाहन चालवून या दोघींना धडक दिली. तसेच त्यांच्या गाडीसह इतर वाहनांचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com