सुपा |वार्ताहर| Supa

नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे नगरकडे भरधाव वेगाने जात असणार्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांचे वडील हभप महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय 80) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.

याप्रकरणी रामदास तरटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास महादेव गाडीलकर हे रस्त्याच्या कडेने आपल्या शेताकडे जात असताना आरोपी श्रेणीक हसमुख लालदोशी यांनी आपल्या चारचाकी गाडी (डीएन 09 के 2913) ने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली आणि गाडीसह नगरच्या दिशेने पळून गेला. वयस्कर गाडीलकर यांना जोराची धडक बसल्याने ते जागेवरच गतप्राण झाले.

मठवस्तीवरील तरुणांनी आपघात करणार्या गाडीचा पाटलाग करत गाडी व चालक लालदोशी याला सुपा टोलनाक्यावर पकडून सुपा पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. तरटे यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी गाडीचालक लालदोशी याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. माधव गाडीलकर हे नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयात उपायुक्त गोरक्षनाथ महादेव गाडीलकर याचे वडील होते. ते वारकरी सांप्रदायाचे आसल्याने पळवे व मठवस्ती भागात मोठी शोककळा पसरली.