अज्ञात वाहनाच्या धडकेत मलठणच्या माजी सरपंचाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत मलठणच्या माजी सरपंचाचा मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अहमदनगर - सोलापूर महामार्गावर निमगाव डाकू येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने माजी सरपंच झुंबर रावसाहेब भिसे यांचा मृत्यू. पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार कर्जत तालुक्यातील मलठण येथील माजी उपसरपंच झुंबर रावसाहेब भिसे (40) हे दुचाकीवरून घरी येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात करणारे वाहन मदत न करता निघून गेले. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये झुंबर भिसे यांचा जागीच मृत्यू झाला. नागरीकांच्या सहकार्याने मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कर्जत येथे नेण्यात आला. कर्जत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग भांडवलकर यांनी अपघातस्थळी भेट दिली. झुंबर विषय हे माजी सरपंच असून त्यांना धार्मिक क्षेत्राची मोठी आवड होती. सामाजिक कार्यामध्ये देखील ती सातत्याने सहभागी असत त्यांच्या मृत्यूने परिसरामध्ये हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com