संगमनेरः वाळू वाहन उलटून तिघा मजुरांचा मृत्यू, एक गंभीर
सार्वमत

संगमनेरः वाळू वाहन उलटून तिघा मजुरांचा मृत्यू, एक गंभीर

निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात उलट्याने अपघात

Anant Patil

संगमनेर - तालुक्यातील हिवरगावपावसा येथील शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे वाळू तस्करी करणारी टाटा झेनॉन ही निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात उलट्याने तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

परवेज भैय्यासाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द), विठ्ठल मारुती बर्डे (वय 30 रा. कोंची, संगमनेर) सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची, ता. संगमनेर) असे मयतांची नावे आहेत. तर अक्षय रावसाहेब माळी (वय 20, रा. कोेंची, ता. संगमनेर) हा जखमी झाला आहे.

एम. एच. 14 ए एच 1073 टाटा झेनॉन मध्ये वाळू भरुन हे तिघे निघाले होते. निमगावमार्गे जात असतांना हिवरगावपावसा खंडोबा मंदिराजवळ निळवंडे कॅनॉलमध्ये हे वाळूचे वाहन उलटले. भरलेल्या वाहनाखाली हे तिघे जण सापडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. मयतांचे मृतदेह संगमनेर कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून जखमीला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, फौजदार इस्माईल शेख, प्रभाकर तोडकरी, पो. नाईक शेंगाळ, पो. ना. आहेर हे घटनास्थळी दाखल झाले.

Deshdoot
www.deshdoot.com