पिकअपच्या धडकेत चांद्याच्या तरुणाचा मृत्यू

चांदा-घोडेगाव रोडवरील घटना
पिकअपच्या धडकेत चांद्याच्या तरुणाचा मृत्यू

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) चांदा-घोडेगाव रोडवर (Chanda-Ghodegav Road) पंचवटीजवळ मोटारसायकल व पिकअपच्या भिषण अपघातात (Accident) चांदा येथील तरुणाचा मृत्यू (Chanda Youth Death) झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

चांदा (Chanda) येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन भगत यांचे चिरंजीव शरद ऊर्फ राजेंद्र मोहनराव भगत (वय 46) यांचा या अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजेदरम्यान पिकअप गाडी चांदा रोडने (Chanda) घोडेगावकडे (Ghodegav) कांदा गोणी (Onion Bag) घेऊन जात असताना पंचवटीजवळ समोरून दुचाकीवर येणार्‍या राजेंद्र मोहनराव भगत यांची समोरासमोर धडक झाली. त्यात राजेंद्र भगत गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांना तातडीने नगर (Nagar) येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघात (Accident) एवढा भीषण होता की त्याच्या प्रचंड आवाजाने आजबाजूच्या परीसरात घबराट पसरली होती. परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. घटनास्थळापासून राजेंद्र भगत यांची वस्तीही याच रोडवर अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परीवार आहे. अपघातात (Accident) गावातील तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ् व्यक्त केली जात आहे . दरम्यान सोनई पोलीस ठाण्याला (Sonai Police Station) घटनेची खबर मिळताच घटनास्थळी दाखल झाले. याबाबत 54/2022 क्रमांकाने अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद केली असून पुढील तपास हवालदार मच्छिंद्र अडकित्ते करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com