अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरी

अहमदनगर|Ahmedagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of a Minor Girl) करणार्‍या आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा (Punishment of Hard Labor) श्रीगोंदा न्यायालयाने (Shrigonda Court) ठोठावली आहे. सचिन शालन पवार (रा. जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पवारविरोधात सन 2020 मध्ये जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल होता.

आरोपी पवार याने सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी (Death Threats) पिडीत मुलीला दिली होती. याप्रकरणी पवार विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने वकील अनिल घोडके यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार एन. ए. रोहोकले यांनी मदत केली.

Related Stories

No stories found.