
लोणी |वार्ताहर| Loni
येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूरच्या रेल्वे कॉलनीत राहणारा मोहन उर्फ सनी प्रसन्ना लोंढे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.
आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे अमिष दाखवून तसेच पळून जाऊ नये म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. ही घटना लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतघडली.
लोणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भा.द. वि.कलम 363, 366(अ), 341, 506, 376(2) (ग) (छ) पोक्सो 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती सपोनि समाधान पाटील यांनी दिली.