अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची घटना अकोले तालुक्यातील पळसुंदे परिसरात घडली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. 2 डिसेंबर 2021 रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन पिडीत मुलगी पळसुंदे परिसरातून घराकडे जात होती. त्यावेळी आरोपी किसन वामन कचरे (वय 21, रा- पळसुंदे, ता. अकोले) याने सदर मुलीला मिठी मारून तिला पाऊल वाटेने ओढ्याकडे एका झाडाजवळ ओढत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला व तू जर घरी कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने दिली. तिच्या फिर्यादीवरून अकोले पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सदर गुन्ह्यात अकोले पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 7 डिसेंबर 2021 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. हांडोरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.