
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला आहे. याप्रकरणी आरोपी शहाबाज रियाज सय्यद विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास तातडीने अटक करण्यात आली असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.
शिर्डी शहरात टेलरिंगचा व्यवसाय करत असलेल्या शहाबाज रियाज सय्यद (वय 24) याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. पीडित मुलीने या त्रासाला कंटाळून अखेर 25 जुलै रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी शहाबाज सय्यद विरुद्ध तक्रार दिली आहे.
पिडीत मुलीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीस तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी शहाबाज सय्यद याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 352/22 भादंवि कलम 376, 376 (3), बालकाचे लैगिक अत्याचार संरक्षण कायदा 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करत आहे.