अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

साडेतीन वर्षापूर्वी राहुरीच्या अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार
अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of a Minor Girl) करून पसार झालेल्या आरोपीला (Accused) साडेतीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी अटक (Police Arrested) केली. अंकुश सोपान बर्डे (रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) असे अटक (Accused) केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बर्डे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

एप्रिल 2018 मध्ये बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून राहुरी तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातून अल्पवयीन मुलीला (Minor Girls) पळवून नेले होते. यानंतर त्या मुलीवर अत्याचार (Atrocities on the Girl) करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल (Filed a crime) आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आरोपी बर्डे ( Accused Barde) पसार होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांचे पथक पसार आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी बर्डे राहुरी बस स्थानक (Rahuri Bus Stand) परिसरात असल्याची माहिती मिळाली.

निरीक्षक कटके (LCB PI Anil Katake) यांनी सदर ठिकाणी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे (Assistant Inspector Somnath Divate), पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, विशाल दळवी, शंकर चौधरी, सागर ससाणे, रणजित जाधव, सागर सुलाने, रोहित येमूल, उमाकांत गावडे यांचे पथक पाठविले. या पथकाने आरोपी बर्डे याला अटक (Arrested) करून राहुरी पोलिसांच्या (Rahuri Police) ताब्यात दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com