मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

अकोले |प्रतिनिधी| Akole

मतिमंद मुलीच्या राहत्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील आढळा विभागातील पिंपळगाव निपाणी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड
तेलकुडगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी भयभीत

याबाबत पिडीताचे नातेवाईक महिलेने अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पिडीत 36 वर्षिय मतिमंद मुलगी असुन तिला बोलता येत नाही. ती जन्मतःच मतिमंद आहे. 28 ऑगस्ट रोजी दुपारी तिचे आई वडिल शेतात मजुरीच्या कामावर गेले होते. त्यावेळी सदर मुलगी ही एकटीच घरी होती. त्यावेळी घरातून तिचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने आवाज कसला व कुठून येतोय हे फिर्यादी हिने पाहण्याचा प्रयत्न केला असता घरातून आवाज येत असल्याचे जाणिव झाल्याने फिर्यादिने मुलाला बरोबर घेतले.

मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड
चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

मुलाला मागील दरवाज्याजवळ पाठवून फिर्यादी पुढच्या दरवाजाकडे जावून जोराचा धक्का दिला असता दरवाजा उघडल्यानंतर घरात दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु हा पिडीत मतिमंद मुलीच्या अंगावर पडून अत्याचार करत होता. त्याची गच्ची धरून पकडले असता तो माझ्याकडून चूक झाली पुन्हा होणार नाही असे म्हणत हाताला धक्का देवून पळून गेला. यावेळी पिडीता भयभीत असल्याने तिला उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड
अकोलेत राजकीय वातावरण पुन्हा तापणार! 'या' तारखेला होणार अगस्ती कारखान्याची निवडणूक

या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. निरिक्षक भुषण हांडोरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com